Connect with us

गोवा खबर

सहकार विकास मंच पॅनेलच्या विजयाबद्दल दामू नाईक यांच्याकडून अभिनंदन

Published

on

Spread the love

गोवा खबर : द गोवा स्टेट को-ऑप. युनियन लिमिटेड, पणजीच्या 2026–27 ते 2030–31 या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकार विकास मंच पॅनेलच्या सर्व विजयी सदस्यांचे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी अभिनंदन केले आहे.

दामू नाईक यांनी प्रसिद्ध केलेल्या संदेशात, सर्व निवडून आलेल्या सदस्यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देत गोव्याच्या सहकार चळवळीला अधिक बळकट करण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.