गोवा खबर : सांगे मतदारसंघातील दाभाळ गावातील एका खाजगी फार्मच्या कर्मचाऱ्यांनी मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या विरोधात दाखल केलेली तक्रार चर्चेनंतर मागे घेतली आहे.
रस्त्याच्या बांधकामावरून निर्माण झालेला गैरसमज दूर झाल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. फळदेसाई यांनी सांगितले की, आपण केवळ लोकांच्या हक्कासाठी आणि गावातील रस्त्याच्या सोयीसाठी प्रयत्न करत होतो आणि यात आपला कोणताही वैयक्तिक स्वार्थ नव्हता.