Connect with us

गोवा खबर

बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या; १७ महिन्यांतील सातवी घटना

Published

on

Spread the love

गोवा खबर : सांकवाळ येथील बिट्स पिलानी कॉलेजमधील पीएचडीच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या २६ वर्षीय अर्जुन साबू या विद्यार्थ्याने वेर्णा येथील आपल्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. गेल्या १७ महिन्यांत या संस्थेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूची ही सातवी घटना असून, यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पोलिसांनी मृतदेहाजवळ एक ‘सुसाईड नोट’ जप्त केली असून अधिक तपास सुरू आहे. जिल्हाधिकारी क्लिट्स यांनी या घटना रोखण्यासाठी कॉलेज प्रशासनाला मानसिक आरोग्य सुविधा वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.