Connect with us

गोवा खबर

आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात कोंकणी चित्रपटांची मोहोर; ‘हळद’ आणि ‘आसेसाव’ ठरले सर्वोत्कृष्ट

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा मनोरंजन संस्था येथे ‘वेव्ह्स आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव ३.०’ चा सांगता सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवासाठी जगभरातून ६३२ चित्रपटांची नोंदणी झाली होती, ज्यापैकी २३४ चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले.

महोत्सवाच्या ओपन विभागामध्ये गोव्यातील शोबिता कुडतरकर दिग्दर्शित ‘हळद’ आणि मांगिरीश बांदोडकर दिग्दर्शित ‘आसेसाव’ या कोंकणी चित्रपटांनी सर्वोच्च स्थान पटकावून विशेष छाप पाडली.

या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अनिल रायकर यांचा चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच प्रशांती तळपणकर यांना ‘हळद’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आले. ‘६० अवर्स’ विभागात मांगिरीश साळगावकर यांच्या ‘उमेद’ चित्रपटाने बाजी मारली, तर सुयश गावडे यांचा ‘याद’ आणि शोबिता कुडतरकर यांचा ‘दुसरो अंक’ हे चित्रपटही अंतिम फेरीत अव्वल ठरले. या कार्यक्रमाला चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि कलाकार उपस्थित होते.