गोवा खबर:नॅशनल टेस्टींग एजन्सीने आयोजित केलेली संगणक आधारित नॅट आणि सावित्रीबाई फुले सॅट पुणे विध्यापिठाने आयोजित केलेली संगणक आधारित सेट परिक्षा देण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी उच्च शिक्षण संचालनालयाच्यावतीने मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
नेट, सेट मार्गदर्शन सत्राचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी https://forms.gle/ewyYUGiQLNXyzbWD6 वर गुगल अर्जातून आपली माहिती भरून नोंदणी करावी. गुगल अर्जातून आपली संपूर्ण माहिती सादर करण्याची शेवटची तारीख १५ मे २०२६ अशी आहे.
सर्वसामान्य, ओबीसी उमेदवारांसाठी १ हजार रूपये, एससी, एसटी, पीएच उमेदवारांसाठी ५०० रुपये, विध्यार्थ्यांसाठी २५० रूपये, एससी, एसटी, पीएच विध्यार्थ्यांसाठी १५० रूपये नोंदणी शुल्क आहे. नोंदणी शुल्क रोख भरावे. कार्डासाठी दोन फोटो द्यावे तर याअगोदर नोंदणी केलेल्या आणि मार्गदर्शन सत्रास हजर राहिलेल्यानी गुगल अर्ज भरम्याची आवश्यकता नाही. त्यांनी थेट मार्गदर्शन सत्रास हजर राहून आपले कार्ज नूतनीकरण करून घ्यावे.
अर्ज जातीचा दाखला, विध्यार्थ्याचे ओळखपत्र, नोंदणी शुल्क भरल्याची पावती आणि इतर माहिती तपासल्यानंतर १८ ते २२ मे २०२६ पर्यंत उच्च शिक्षण संचालनालय, साखिकी विभाग, दुसरा मजला, एस-७ए एसीईआरटी इमारत, पर्वरी येते नोंदणी कार्ड जारी करण्यात येईल. मार्गदर्शन सत्राविषयी वेळापत्रक नोंदणी कार्ड जारी करण्याच्यावेळी देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी प्रदिप मराठे मो. क्र ९४२०६८७२२० किंवा सारिका पाळणी- मो क्र- ९८२३५२२२११ यांच्याशी संपर्क साधावा.