गोवा खबर : आम आदमी पक्षाला (आप) मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, पक्षाचे संस्थापक सदस्य आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केल्याची चर्चा आहे. ‘आप’मधील दोन-तृतीयांश खासदारांसह ते भाजपमध्ये विलीन होणार असल्याचे वृत्त आहे.
यामध्ये क्रिकेटपटू हरभजन सिंग, स्वाती मालीवाल आणि संदीप पाठक यांच्यासह ७ खासदारांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. “आप पक्ष देशाऐवजी वैयक्तिक फायद्यासाठी काम करत आहे,” अशी टीका चड्ढा यांनी पत्रकार परिषदेत केल्याचे समजते. या संभाव्य फुटीमुळे दिल्लीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.