Connect with us

गोवा खबर

राष्ट्रपती भवनात कावी आर्टचा गौरव; गोव्याचा अभिमान उंचावला

Published

on

Spread the love

गोवा खबर :गोव्याच्या पारंपरिक कावी आर्टला राष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान मिळाला आहे. कावी आर्ट कलाकार सागर नाईक मुळे यांची राष्ट्रपती भवनातील Artist in Residency कार्यक्रमासाठी निवड झाली होती. हा प्रतिष्ठित कार्यक्रम १४ ते २३ एप्रिल २०२६ दरम्यान पार पडला.

या कालावधीत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सागर मुळ्ये यांच्या कलेचे आणि त्यांच्या पारंपरिक वेशभूषेचे विशेष कौतुक केले. यावेळी राष्ट्रपतींकडून त्यांना सोन्याचा मुलामा दिलेला फ्रेम आणि शाल देऊन सन्मानित करण्यात आले.

सागर मुळे यांनी हा सन्मान गोव्याची माती आणि सांस्कृतिक परंपरेला समर्पित केल्याचे सांगितले. कावी आर्ट ही गोव्याची एक प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण भित्तिचित्र कला असून, तिचा जागतिक स्तरावर प्रचार-प्रसार करण्यासाठी ते कार्यरत आहेत.

या यशामुळे गोव्याच्या कला आणि संस्कृतीचा सन्मान देशभरात उंचावला असून, कलाकारांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.