Connect with us

गोवा खबर

गोव्याच्या ३८ महत्त्वाच्या प्रश्नांवर संसदेचे लक्ष वेधले : सदानंद तानावडे

Published

on

Spread the love

विमान प्रवास, स्वतंत्र पोस्टल सर्कल आणि शेतकरी हिताच्या मागण्या

गोवा खबर : राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी संसदेच्या अधिवेशनात गोव्याशी निगडित तब्बल ३८ प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी घेतलेल्या पाठपुराव्यामुळे गोवेकरांना केंद्र सरकारकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

  • महत्त्वाचे मुद्दे: गोवा ते मुंबई विमान प्रवास सामान्यांना परवडत नसल्याने महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच, महाराष्ट्रासोबत असलेले गोव्याचे ‘पोस्टल सर्कल’ स्वतंत्र करावे, जेणेकरून प्रशासकीय कामे जलद होतील.
  • शेतकरी हित: जंगली जनावरांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी स्वतंत्र फळांच्या झाडांची लागवड आणि शेतकरी सन्मान निधीच्या लाभाबाबतही त्यांनी आग्रही मागणी केली.