Connect with us

गोवा खबर

राज्यस्तरीय ‘किल्ले बनवा स्पर्धे’चे रवींद्र भवन, साखळी येथे ३ एप्रिलला होणार बक्षिस वितरण

Published

on

Spread the love

अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटनेचा उपक्रम


भाग्यनगर, तेलंगाणाचे आमदार राजा सिंह ठाकूर यांचे होणार विशेष मार्गदर्शन

गोवा खबर:अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटना आणि गोवा सरकारचे पुराभिलेक अन् पुरातत्त्व संचानलाय यांच्या संयुक्त विद्यमाने गतवर्षी दिपावलीच्या निमित्ताने युवकांमध्ये शौर्यजागृती करण्यासाठी राज्यस्तरीय ‘किल्ले बनवा स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत राज्यभरातून १५२ किल्ले साकारण्यात आले होते आणि स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. स्पर्धेचा निकालही घोषित झालेला आहे. या स्पर्धेचे बक्षिण वितरण शुक्रवार, ३ एप्रिल या दिवशी सायंकाळी ४ वाजता रवींद्र भवन, साखळी येथे होणार आहे. कार्यक्रमाचे वैशिष्ट या कार्यक्रमाला प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा भाग्यनगर, तेलंगाणाचे आमदार राजा सिंह ठाकूर यांचे प्रमुख वक्ता या नात्याने मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमाला विशेष अतिथी या नात्याने समाजकल्याणमंत्री सर्वश्री सुभाष फळदेसाई, भाजपचे वास्को मतदारसंघाचे आमदार दाजी (कृष्णा) साळकर, ‘अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटने’चे अध्यक्ष संकेत आर्सेकर आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांची उपस्थित असणार आहे, अशी माहिती अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटनेचे उपाध्यक्ष सर्वश्री राजेंद्र देसाई यांनी दिली आहे. या वेळी अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटनेचे सचिव सत्यविजय नाईक, खजिनदार सुजय देसाई, समितीचे सदस्य नारायण नाडकर्णी, मनोज गावकर, स्वप्निल नाईक, इच्छित फळदेसाई, सुचंद्र अग्नी आणि मिथिल देसाई यांचीही उपस्थिती होती.
       गोवा सरकारने ‘गोवा प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायदा, १९७८’ अंतर्गत फोंडा येथील ‘मर्दनगड’ आणि जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ या ऐतिहासिक वास्तू संरक्षित स्मारके म्हणून घोषित करून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा स्तुत्य निर्णय नुकताच घेतला आहे. या पार्श्वभूमीवर फोंडा येथील ‘मर्दनगडा’चे संवर्धन व्हावे यासाठी गोवा विधानसभेत मागणी करणारे आणि ‘मर्दनगडा’चे संवर्धनासाठी सर्वतोपरी सहकार्य करणारे गोवा सरकारमधील तत्कालीन पुराभिलेक अन् पुरातत्त्व मंत्री आणि विद्यमान समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांचा या कार्यक्रमात ‘मर्दनगड संवर्धन समिती’ आणि अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटना’ यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटनेने ‘किल्ले बनवा स्पर्धा’ ही समुदाय स्तरावरील स्पर्धा जिल्हास्तरावर (उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा), तर वैयक्तिक घरगुती स्तरावरील स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित केली होती. स्पर्धेत समुदाय स्तरावर ५८, तर वैयक्तिक घरगुती स्तरावर ९४ स्पर्धक सहभागी झाले होते. या बक्षिस वितरण सोहळ्याला सर्व स्पर्धक आणि शिवप्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी, असे आवाहन अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटननेने केले आहे.