गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अट्टुकल पोंगलच्या पावन प्रसंगी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी नारी शक्तीच्या या सणाचे विशेष महत्त्व अधोरेखित केले आणि या शुभ प्रसंगी समाजात समृद्धी, उत्तम आरोग्य, सौहार्द आणि एकता वृद्धिंगत व्हावी यासाठी प्रार्थना केली.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील संदेशात लिहिले; अट्टुकल पोंगलच्या पावन प्रसंगी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या नारी शक्तीसाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे. हा शुभ दिवस प्रत्येकाच्या जीवनात समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात सुसंवाद आणि एकतेची भावना अधिक दृढ होवो.