Connect with us

गोवा खबर

पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर आलेले फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे केले स्वागत

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या दौऱ्यावर असलेले फिनलंड प्रजासत्ताकाचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे स्वागत केले.

या दौऱ्यामुळे भारत आणि फिनलंड यांच्यातील द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत होतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी याआधी समाज माध्यमांवरील पोस्ट मध्ये लिहिताना आपण भारताच्या दौऱ्यावर असून भारताच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधान तसेच मंत्रिमंडळातील इतर मान्यवरांना भेटण्यास उत्सुक आहोत, असे लिहिले होते. या दौऱ्यामुळे भारत आणि फिनलंड यांच्यातील संबंध मजबूत होतील, विशषेतः व्यापार क्षेत्राला त्याचा अधिक लाभ होईल, असे त्यांनी लिहिले आहे.

फिनलँडच्या अध्यक्षांच्या एक्स समाजमाध्यमावरील पोस्टला दिलेल्या प्रतिसादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले आहे, “अध्यक्ष अलेक्झांडर स्टब, तुमचे भारतात स्वागत आहे. मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे, तुमची भेट, भारत-फिनलंड संबंधांना एका नव्या उंचीवर घेऊन जाईल. उद्या होणाऱ्या आपल्या बैठकीची आणि रायसीना संवाद 2026 मधील तुमच्या मुख्य भाषणाची मी आतुरतेने वाट पाहत आहे.