Connect with us

गोवा खबर

कितीही खटले घातले तरी घरे लोकांच्या नावावर करणारच : मुख्यमंत्री

Published

on

Spread the love

गोवा खबर : जनतेला त्यांच्या हक्काची घरे मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘माझे घर’ योजनेबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोठा शब्द दिला आहे. फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरात आयोजित ‘गृहआधार’ शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

काही विरोधकांनी या योजनेतील लाभार्थ्यांवर खटले भरले आहेत, मात्र मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले की, “कितीही खटले भरले तरी घरे लोकांच्या नावावर केल्याशिवाय राहणार नाही.” यावेळी त्यांनी ‘गृहआधार’ योजनेचे पैसे आता दर महिन्याच्या १० तारखेला महिलांच्या खात्यात जमा होतील, अशी घोषणाही केली.

सध्या राज्यातील १ लाख ८० हजार महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.