गोवा खबर : दक्षिण गोवा खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी आघाडीविषयी केलेल्या विधानावरून काँग्रेस नेत्यांमध्ये पुन्हा एकदा मतभेद असल्याचे दिसून येत आहे.
आरजीचे (RG) आमदार विरेश बोरकर यांनी यावरून काँग्रेसवर टीका केली असून, काँग्रेसला मनापासून आघाडी करायची नाही, असा आरोप केला आहे.
प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी स्पष्ट केले की, युतीबाबतचे निर्णय सामूहिकरीत्या घेतले जातात आणि कोणताही निर्णय एकतर्फी घेतला जाणार नाही.