गोवा खबर : फोंड्यातील मंदिरांचे वैभव आणि निसर्गसौंदर्य पर्यटकांना उंचावरून पाहता यावे, यासाठी फर्मागुडी, सिद्धनाथ पर्वत आणि मर्दनगड या तीन डोंगरांना जोडणारा ‘रोप-वे’ केबल प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे.
* २०२७ पर्यंत पूर्णत्व:
२०२७ पर्यंत फर्मागुडी येथील नव्या किल्ल्याचे लोकार्पण करण्याचे सरकारचे मानस असून, त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न आहे.
* पर्यटनाला चालना:
१५० मीटर उंचीवरून पर्यटकांना इथल्या निसर्गाचा आनंद घेता येईल, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.