गोवा खबर : धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटित होण्याचा निर्धार हिंदु जनजागृती समितीने मयते, अस्नोडा येथील श्री शांतादुर्गा मंदिरात आयोजित केलेल्या
हिंदू राष्ट्र-जागृती सभेत केला.
या सभेला ‘गोमंतक मंदिर महासंघा’चे सचिव जयेश थळी आणि हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सत्यविजय नाईक यांनी ‘मंदिरांचे आध्यात्मिक महत्त्व आणि सद्यस्थितीत हिंदूंना भेडसावणार्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना’ याविषयांवर मार्गदर्शन केले.

हिंदु राष्ट्र-जागृती सभेत मार्गदर्शन करतांना जयेश थळी.
सभेत जयेश थळी म्हणाले, ‘‘शरीरातील ‘मूलाधार चक्र’ बिघडल्यास संपूर्ण शरीर ऊर्जाविहीन होऊन बाह्य विषाणूंचे शरीरावरील आक्रमण वाढते. गावातील मंदिरे ही समाजाचे मूलाधार चक्र आहे. आपण गावातील मुख्य ऊर्जास्थान म्हणजेच मंदिरापासून दूर गेल्याने आज समाजाचे आरोग्य बिघडले आहे. आज सत्त्वगुणी समाज बरोबरच कार्य करण्यासाठी समाजला रजोगुणाचीही (शक्तीची) आवश्यकता असते. ही शक्ती मिळवण्यासाठी मंदिरातून मोठ्या प्रमाणात सामूहिक ‘महाआरती’ सुरू होणे आवश्यक आहे.’’

सभेत उपस्थित जनसमुदाय.
सत्यविजय नाईक म्हणाले,‘‘हिंदू आज हिंदूंमध्ये धर्माचरणाविषयी अज्ञान आहे आणि हिंदूंची स्वसंरक्षणासाठी सिद्धता नाही. यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन आणि साधना करून ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज जागृत करणे काळाची गरज आहे.’’ सभेचे सूत्रसंचालन राहुल वझे, तर आभार प्रदर्शन शैलेश शिरोडकर यांनी केले.
हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या अखेर हनुमान मंदिरात प्रत्येक शनिवारी हनुमान चालीसा व धर्मशिक्षण वर्ग घेणे, १९ फेब्रुवारी या दिवशी अडवलपाल येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करणे, युवकांसाठी शांतादुर्गा मंदिरात संस्कार शिबिर घेणे आणि अस्नोडा येथे मंदिर विश्वस्तांना संघटित करण्यासाठी एक विशेष कार्यक्रम घेण्याचे निश्चित झाले.