Connect with us

गोवा खबर

पर्वरीत ‘इको-फ्रेंडली’ कार्निव्हल; इंजिन आणि जनरेटरशिवाय निघणार मिरवणूक

Published

on

Spread the love

गोवा खबर : यंदाचा गोवा कार्निव्हल (१३ ते १७ फेब्रुवारी) काहीसा वेगळा ठरणार आहे. विशेषतः पर्वरी येथे १३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणारा ‘पीपल्स कार्निव्हल’ पूर्णपणे पर्यावरणपूरक असेल. पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या मिरवणुकीत एकही इंजिन, जनरेटर किंवा मोटरवर चालणारा चित्ररथ नसेल.

“मूळ गोमंतकीय संस्कृतीचे जतन करणे आणि कार्निव्हलला त्याचे जुने स्वरूप परत मिळवून देणे” हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या मिरवणुकीत केवळ वाद्ये, पारंपरिक नृत्य आणि मानवी ऊर्जेवर चालणारे देखावे पाहायला मिळतील. गोंगाट आणि प्रदूषण टाळून सणाचा आनंद लुटण्याचा हा नवा पायंडा पर्वरीकरांनी घातला आहे.