Connect with us

गोवा खबर

‘वन मॅप गोवा’सोबत अमर्याद शक्यता अनलॉक करा

Published

on

Spread the love

गोवा खबर : हल्ली हल्लीपर्यंत गोव्यात अचूक जमीन किंवा पायाभूत सुविधांची माहिती मिळवणे म्हणजे कागदांचे गठ्ठे चाळणे, अनेक सरकारी कार्यालयांत फेऱ्या मारणे आणि जुन्या नकाशांवर अवलंबून राहणे असे होते. एखादा नागरिक जवळचे रुग्णालय शोधत असेल, एखादा व्यावसायिक गुंतवणुकीसाठी योग्य जागा पाहत असेल किंवा एखादा नियोजक भविष्यातील पायाभूत सुविधा आखत असेल, तर ही प्रक्रिया संथ आणि विस्कळीत होती. मात्र २०२४ मध्ये ही परिस्थिती बदलली.

वन मॅप गोवाच्या शुभारंभासह, राज्याने भौगोलिक माहिती (स्पेशल डेटा) सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले. माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स विभाग (डीआयटीईएण्डसी) आणि गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (जीईएल) यांच्या सहकार्याने विकसित केलेले वन मॅप गोवा जीआयएस पोर्टल, गोव्याची सर्व भौगोलिक माहिती एका सोप्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्र आणते. हा प्लॅटफॉर्म मोबाईल किंवा लॅपटॉपवरून, जगात कुठूनही वापरता येतो.

नागरिकांसाठी याचा अर्थ दैनंदिन जीवनात मोठी सोय. ३२ सरकारी विभागांमधील माहिती २७३ स्तरांमध्ये (लेअर्स) एकत्र करून, हे पोर्टल एकसंध आणि स्पष्ट चित्र देते. जमीन नोंदी, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवा एकाच नकाशावर पाहता येतात.

जवळच्या शाळा, रुग्णालये किंवा सार्वजनिक सुविधा शोधणे, हॉटेलपासून समुद्रकिनाऱ्यापर्यंतचे अंतर मोजणे किंवा आपल्या परिसरातील सुविधा तपासणे—‘नियरॅस्ट मी’, ‘अरावंड मी’ आणि ‘मेजर’ सारखी साधने गुंतागुंतीची माहिती सोप्या उत्तरांत बदलतात. वापरकर्ते ठिकाणे सेव्ह करू शकतात, परिसरांची तुलना करू शकतात आणि नकाशे पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करून ऑफलाइनही वापरू शकतात. तसेच, अंगभूत फीडबॅक प्रणालीमुळे नागरिकांचा सहभागही प्रोत्साहित केला जातो.

नियोजक आणि सरकारी विभागांसाठी वन मॅप गोवा हे केवळ नकाशा पाहण्याचे साधन नाही. प्रगत जीआयएस एडिटिंग आणि संपूर्ण ऑडिट ट्रेल्समुळे विभागांना प्रत्यक्ष वेळेत मालमत्ता पाहणी व अद्ययावत करता येते. सरकारी वाहनांचा मागोवा घेणे असो किंवा पायाभूत सुविधांचे मॅपिंग, हे पोर्टल अचूक नियोजन, कार्यक्षमतेत वाढ आणि डेटा-आधारित निर्णय घेण्यास मदत करते. ही सिस्टम पीएम गतीशक्ती आणि स्मार्ट सिटीसारख्या राष्ट्रीय व स्थानिक उपक्रमांशीही जोडलेले आहे, ज्यामुळे व्यापक विकास उद्दिष्टांशी सुसंगती राखली जाते.

वन मॅप गोवा हा फक्त नकाशा नसून, गोव्याचे नियोजन, उभारणी आणि वाढ हे बदलणारे साधन आहे. भौगोलिक माहिती नागरिक, नियोजक आणि गुंतवणूकदारांच्या हातात देऊन, गोवा सरकार अधिक स्मार्ट, सर्वसमावेशक आणि भविष्यासाठी सज्ज राज्याची पायाभरणी करत आहे.