गोवा खबर : येत्या ९ ते ११ जानेवारी दरम्यान पणजीतील कला अकादमीत २१ वे जागतिक मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत स्वागताध्यक्ष असतील.
या तीन दिवसांत तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा आणि पर्यटनावर आधारित विविध परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. महेश मांजरेकर यांना ‘कला जीवन गौरव’ तर अनिल खंवटे यांना ‘जागतिक मराठी भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. समारोप समारंभाला माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार सदानंद शेट तानावडे यांची उपस्थिती असेल.