Connect with us

गोवा खबर

बांगलादेशातील हिंदूंवरील वाढते अत्याचार थांबवा ! हिंदु राष्ट्र समन्वय समितीची केंद्राकडे मागणी

Published

on

Spread the love
  • फोंडा येथील उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन सूपुर्द


गोवा खबर : बांगलादेशातील हिंदूंवरील वाढते अत्याचार, हत्या व धार्मिक छळ तात्काळ थांबवण्यासाठी कडक राजनैतिक हस्तक्षेप व आंतरराष्ट्रीय दबाव टाकावा. तसेच गोव्यातील बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढून त्यांना देशातून हाकलून द्यावे, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

केंद्र सरकारला हे निवेदन पाठवण्यासाठी फोंडा येथील उपजिल्हाधिकारी कौशिक आमोणकर यांना २४ डिसेंबर या दिवशी हे निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या शिष्टमंडळामध्ये सर्वश्री प्रकाश नाईक, राजेंद्र बर्वे, मनोज गावकर, सत्यविजय नाईक, सुचेंद्र अग्नी, सूरज नाईक, लोलयेकर, रेश्मा तळावलीकर, रोहिणी शिंदे, अनिता पवार, हर्षा गुरव, लीना च्यारी, मिताली राणे आदींचा सहभाग होता.

निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू समाजावर सुनियोजित, संघटित व क्रूर स्वरूपाचे अत्याचार सुरू आहेत. केवळ हिंदूंच्या हत्या नव्हे, तर हिंदूंची घरे, मंदिरे जाळण्यात येत आहेत, महिलांवर बलात्कार होत आहेत, अनेक ठिकाणी हिंदूंना लक्ष्य करण्यात येत आहे. भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूविरोधी घटनांचा तीव्र निषेध नोंदवावा.

संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग, ‘सार्क’ यांसारख्या मंचांवर बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराचा मुद्दा अधिकृत आकडेवारीसह मांडून ‘फॅक्ट-फाइंडिंग मिशन’ची मागणी करावी. बांगलादेशातील अत्याचार थांबत नसतील तर बांगलादेशासोबतचे आर्थिक, व्यापारिक व राजनैतिक निर्बंध घालण्याचा निर्णय घ्यावा, तसेच बांगलादेशातील दहशतवादी व कट्टरतावादी घटकांविरोधात कठोर पावले उचलली जावीत.