Connect with us

गोवा खबर

त्र्यंबकेश्वरच्या आखाड्यांना कुंभमेळा निमित्ताने मोठ्या प्रमाणावर निधी द्यावा; त्र्यंबकेश्वरच्या साधूंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Published

on

Spread the love
नाशिक मध्ये भूमिपूजनास साधू महंत लावणार हजेरी
नाशिक खबर:त्रंबकेश्वर मधील  आखाड्यांना सिंहस्थ कुंभमेळा निमित्ताने मोठ्या प्रमाणावर निधी द्यावा अशी अशी मागणी येथील आखाड्यांच्या वतीने उद्या नाशिकला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे करण्यात येणार आहे. तशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री यांना देण्यात येणार असल्याची माहिती त्रंबकेश्वर मधील एक प्रमुख महंत शंकरानंद सरस्वती महाराज यानी दिली आहे.
उद्या नाशिक मध्ये होणाऱ्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी त्रंबकेश्वर मधील साधू महंतांना देखील शासना मार्फत  उपजिल्हाधिकाऱ्यांकडून
निमंत्रण देण्यात आले आहे.ठक्कर मैदान एबीपी सर्कल त्रंबक रोड  येथे दुपारी बारा वाजता होणाऱ्या भूमिपूजन समारंभास त्रंबकेश्वर मधील साधू महंत उपस्थित राहणार आहेत त्रंबकेश्वर मध्ये सर्व आखाड्यांना असे पत्र देण्यात आल्याची माहिती स्थानिक पातळीवर आखाड्यांच्या वतीने महंत शंकरानंद सरस्वती महाराज  यां दिली आहे.
 नाशिक मधील साधू महंत देखील वरील कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मधील भाजपचे कार्यकर्ते देखील नाशिकमध्ये कार्यक्रमात जाणार असल्याचे समजते आचारसंहिता असल्याने मुख्यमंत्री त्रंबकेश्वर येथे कोणत्याही भूमिपूजनासाठी येणार नाहीत. असे जरी असले तरी मुख्यमंत्री त्रंबकेश्वर मध्ये दर्शनास येण्याची शक्यता आहे.
 दरम्यान साधू हा निधी यात्रेकरू भाविकांच्या सेवेसाठी वापरणार आहे अर्थात असा निधी कामांच्या स्वरूपात दिला जातो. प्रत्येक आखाड्यासाठी एक कोटी रुपये निधी मंजूर करण्याचे नियोजन यापूर्वीच करण्यात आल्याचे असल्याचे कळते. आता  निधी  सुविधांसाठी लवकर मिळावा अशी मागणी आहे.