Connect with us

गोवा खबर

हेल्थवेच्या वतीने मोफत मणक्याच्या आरोग्य शिबिराचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर : हेल्थवे हॉस्पिटल्स, गोवा, यांच्या वतीने शनिवार, ८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९:३० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत एला व्हिलेज, कदंब पठार, ओल्ड गोवा येथे मोफत मणक्याच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराचे उद्दिष्ट आजच्या काळात वाढत चाललेल्या मणक्याशी संबंधित आजारांवर मार्गदर्शन करणे आहे. चुकीच्या बसण्याच्या किंवा कामाच्या सवयी, जास्त ताणतणाव आणि चुकीची बैठक यामुळे अनेकांना पाठीचा त्रास, मानेचा त्रास, सायटिका, हात-पाय सुन्न होणे, स्नायूंमध्ये आखडलेपणा, नसांवरील दाब असे प्रश्न उद्भवतात.

या शिबिरात खालील आजारांबाबत सविस्तर माहिती आणि सल्ला दिला जाईल:

  • ऑस्टिओपोरोसिस (हाडांची ठिसूळता)

  • स्पाइन आर्थ्रायटिस (मणक्याचा संधिवात)

  • डिस्क प्रॉब्लेम्स आणि डिस्क डीजेनेरेशन

  • अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिस आणि इतर मणक्याचे विकार

शिबिरात सहभागी होणाऱ्यांना डॉ. संबप्रसाद नाडकर्णी (ऑर्थोपfडिक व स्पाइन सर्जन) आणि डॉ. निखिल भूमकर (पेन फिजिशियन) यांच्याकडून मोफत वैद्यकीय सल्ला दिला जाईल.

तसेच सहभागींसाठी खालील लाभही मिळतील:

  • मोफत ब्लड शुगर चाचणी

  • एमआरआय स्पाइन तपासणीवर ४०% सवलत (जर आवश्यक असेल तर)

  • प्रोसीजर सल्ल्यावर २५% सवलत

तारीख आणि वेळ: शनिवार, ८ नोव्हेंबर २०२५ | सकाळी ९:३० ते दुपारी १:००
स्थळ: प्लॉट नं. १३२/१ (भाग), एला व्हिलेज, कदंब पठार, ओल्ड गोवा
प्रवेश: मोफत (मर्यादित जागा उपलब्ध)
अपॉइंटमेंटसाठी ७०३०९ ६१२४९ ह्या क्रमांकावर संपर्क करा