Connect with us

गोवा खबर

विरोध करणारे आता अर्ज वाटताहेत : मुख्यमंत्री सावंत यांचा टोला

Published

on

Spread the love

गोवा खबर : ‘माझे घर’ योजनेला विधानसभेत विरोध करणारेच आता अर्ज वाटताहेत, असा टोला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुकूर येथील कार्यक्रमात लगावला.

ते म्हणाले, ही योजना जाती-धर्माच्या पलीकडे सर्वांसाठी आहे. २८ फेब्रुवारी २०१४ पूर्वीचे रहिवासी आणि घरे असलेले सर्व नागरिक अर्ज दाखल करून आपली घरे कायदेशीर करू शकतात. कुणाचेच घर मोडले जाणार नाही.

मंत्री रोहन खंवटे आणि खासदार सदानंद तानावडे यांनी सरकारच्या या प्रयत्नांचे अभिनंदन केले.