Connect with us

गोवा खबर

पोलिस मारहाणीच्या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी व्हावी : आमदार फेरेरा

Published

on

Spread the love

गोवा खबर : नावेली येथील एडबर्ग परेरा या युवकावर पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांकडून व्हावा, अशी मागणी हळदोणेचे आमदार अॅड. कार्ल्स फेरेरा यांनी केली आहे.

ही घटना मडगाव पोलिस स्थानकात घडली. त्यामुळे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत होते का, हे तपासले जावे, असे त्यांनी सांगितले. न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक पोलिस स्थानकात सीसीटीव्ही असणे बंधनकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.

फेरेरा यांनी प्रश्न उपस्थित केला, “जर एडबर्ग स्वतः पडला असेल तर उपनिरीक्षकालाच निलंबित का केले? इतर कर्मचाऱ्यांवर कारवाई का नाही?”

त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सांगितले की, या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती आवश्यक आहे.

दरम्यान, या घटनेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पोलिस महासंचालकांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे.