Connect with us

गोवा खबर

फिजिक्‍सवालाकडून जेईई व नीट समुपदेशनासाठी पणजी आणि मडगावमध्‍ये इन्‍फो सेंटरचे उद्घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर : शिक्षण कंपनी फिजिक्‍सवाला (पीडब्ल्‍यू) ने पणजी आणि मडगावमध्‍ये नवीन पीडब्‍ल्‍यू इन्‍फो सेंटर्सचे उद्घाटन केले आहे, तसेच नजीकच्‍या भविष्‍यात याच ठिकाणाच्‍या आसपासच्‍या परिसरात नवीन तंत्रज्ञान-सक्षम ऑफलाइन विद्यापीठ केंद्र लॉंच करण्‍याची योजना आहे. उद्घाटन करण्‍यात आलेली नवीन केंद्रे पॅटो प्‍लाझा (पणजी) आणि दि ओसिया मॉल (मडगाव) येथे स्थित आहेत आणि आठवड्याचे सात दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कार्यरत असतील. विद्यार्थी जेईई व नीट (NEET) अशा परीक्षांसंदर्भात समुपदेशन घेण्‍यासाठी इन्‍फो सेंटरला भेट देऊ शकतात. 

नवीन पीडब्‍ल्‍यू इन्‍फो सेंटरचा संपूर्ण पत्ता:

पणजी: २११/ए, दुसरा मजला, गेरा इम्‍पेरियम ग्रँड, प्‍लॉट क्र. ४१ व ४२, पॅटो प्‍लाझा, पणजी, गोवा – ४०३००१.

मडगाव: एफ-१३, पहिला मजला, दि ओसिया मॉल, केटीसी बस स्‍टॅण्‍डजवळ, मडगाव, गोवा – ४०३६०१.

नवीन पीडब्‍ल्‍यू इन्‍फो सेंटर्स पोर्वोरिम, बॅम्‍बोलिम, कुजिरा, इनेझ, मापुसा, वाल्‍पोई, सत्तारी, होंडा, कुंकेाजिलम, फोंडा, सॅवोर्डेम, क्‍वीपम, दाबोलिम, वास्‍को, कॅन्‍कोना अशा भागांमध्‍ये शैक्षणिक समुपदेशन आणि स्‍पर्धात्‍मक प्रशिक्षणाच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यास सज्‍ज आहेत.

पीडब्‍ल्‍यू इन्‍फो सेंटर प्रवेश, आर्थिक मदत आणि पीडब्‍ल्‍यू बॅचेससाठी नोंदणीबाबत माहितीसाठी एक-थांबा गंतव्‍य म्‍हणून सेवा देते, तसेच विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या शैक्षणिक प्रवासाबाबत माहितीपूर्ण निर्णय घेण्‍यास मदत करण्‍यासाठी समुपदेशन आणि सहाय्यक सेवा देते. विद्यार्थी जेईई व नीट परीक्षेच्‍या तयारीबाबत वैयक्तिकृत समुपदेशनासाठी येऊ शकतात, जेथे त्‍यांना अभ्‍यास योजना, परीक्षा धोरणे आणि सर्वसमावेशक कोर्स तपशीलांबाबत सल्‍ला मिळू शकतो.

*फिजिक्‍सवाला (पीडब्‍ल्‍यू)च्‍या विद्यापीठ-ऑफलाइनचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अंकित गुप्‍ता म्‍हणाले,* “पणजी आणि मडगावमध्‍ये उद्घाटन करण्‍यात आलेल्‍या पीडब्‍ल्‍यू इन्‍फो सेंटर्समधून त्‍या प्रांतामधील विद्यार्थ्‍यांना समुपदेशन व शैक्षणिक मार्गदर्शन उपलब्‍ध करून देण्‍याप्रती आमचे प्रयत्‍न दिसून येतात. या पुढाकाराचा या सेवांचा शोध घेण्‍यामध्‍ये प्रवास करण्‍याची गरज दूर करण्‍याचा मनसुबा आहे. अधिक पुढे जात आमची याच क्षेत्रामधील विद्यापीठ सेंटरसोबत इन्‍फो सेंटरला एकीकृत करण्‍याची योजना आहे, जेथे विद्यार्थ्‍यांना नीट व जेईई परीक्षा तयारी व पायाभूत सुविधेशी संबंधित कोर्सेस् दिले जातील.”

फिजिक्‍सवालाने नुकतेच शिष्‍यवृत्ती चाचणी पीडब्‍ल्‍यूएनएसएटी (फिजिक्‍सवाला नॅशनल स्‍कॉलरशिप कम अॅडमिशन टेस्‍ट) २०२५ च्‍या चौथ्‍या पर्वाची घोषणा केली. हा उपक्रम विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या आर्थिक पार्श्वभूमीकडे न पाहता शिक्षण व मार्गदर्शन उपलब्‍ध करून देत नीट-यूजी (NEET-UG) आणि आयआयटी-जेईई (IIT-JEE) उमेदवारांना पाठिंबा देण्‍याचा प्रयत्‍न करतो.

 पीडब्‍ल्‍यूएनएसएटी २०२५ परीक्षा ऑनलाइन व ऑफलाइन मोड्समध्‍ये घेतली जाते. परीक्षेसाठी नोंदणी मोफत आहे आणि इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी, तसेच पीसीएम व पीसीबी या दोन्‍ही स्‍ट्रीम्‍समधील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्‍यांसाठी खुली आहे.