Connect with us

गोवा खबर

आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा २०२५ मध्ये ‘NIEPID DISHA’ अभ्यासक्रम साहित्याचे अनावरण

Published

on

Spread the love
  • बौद्धिक दिव्यंगत्व असलेल्या ५०,००० मुलांना सक्षम करण्यासाठी अशा प्रकारचा पहिला राष्ट्रीय अभ्यासक्रम

गोवा खबर : या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा २०२५ मध्ये NIEPID DISHA अभ्यासक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठीची कार्यपुस्तिका आणि शिक्षकांसाठीची मार्गदर्शक पुस्तिका सादर करण्यात आली. याद्वारे विशेष शिक्षण क्षेत्रातील एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले.

केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार; गोवा राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे मंत्री सुभाष फळदेसाई; केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अगरवाल; गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावस्कर आणि जय वकील फाउंडेशन, मुंबईच्या सीईओ  अर्चना चंद्रा यांच्या उपस्थितीत हे प्रकाशन करण्यात आले.

भारतात पहिल्यांदाच राष्ट्रीय निधी अंतर्गत, NIEPIDद्वारे विविध भाषांमध्ये विकसित दिशा अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी कार्यपुस्तिकांते देशभरातील सुमारे ५०,००० बौद्धिक दिव्यांग विद्यार्थी आणि १०,००० विशेष शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना मोफत वितरित करण्यात येणार आहे.

NIEPID दिशा अभ्यासक्रमाद्वारे वैयक्तिक शैक्षणिक योजना (IEPs)नुसार मूल्यांकन, नियोजन आणि अंमलबजावणीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म प्रदान करतो. बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रभावी शिक्षणासाठी संरचित पाठ्यपुस्तके उपलब्ध करण्याबरोबरच शिक्षकांना प्रभावी अध्यापनासाठी प्रमाणित मार्गदर्शिक पुस्तिका या प्लॅटफॉर्मद्वारे उपलब्ध झाल्या आहेत.

याबाबत पावसकर म्हणाले, “NIEPID दिशा अभ्यासक्रमाची सुरुवात ही समावेशक शिक्षणाबाबत एक निर्णायक क्षण आहे. पहिल्यांदाच, बौद्धिक दिव्यांग मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी एकीकृत, पुरावाधिष्ठित अध्ययनचौकट उपलब्ध झाली आहे. या उपक्रमामुळे समावेशक शिक्षणाला एक ठोस दिशा आणि खरा अर्थ मिळणार आहे.”

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, गोवा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण समिती (GSCERT) आणि राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सक्षमीकरण संस्था (NIEPID), सिकंदराबाद आणि राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय यांनी बौद्धिक दिव्यांग मुलांसाठी NIEPID दिशा अभ्यासक्रम लागू करण्यासाठी गोवा राज्यातील विविध विशेष शाळांमधील २४० विशेष शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता.