Connect with us

गोवा खबर

आरोप सिद्ध झाले तर आरजी बंद करू : मनोज परब यांचे आमदार लोबोंना आव्हान

Published

on

Spread the love

गोवा खबर : कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केलेल्या आरोपांवर आरजी पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, लोबो यांनी सांगितले तसे आम्ही दिल्लीतील बिल्डरांकडून पैसे घेतलेले नाहीत. जर आमच्याविरुद्धचे आरोप त्यांनी सिद्ध केले, तर आम्ही ‘आरजी’ पक्षच बंद करू.

मनोज परब यांनी लोबो यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की, कळंगुट आणि कांदोळी ही गावे त्यांनी परप्रांतीय बिल्डरांच्या हाती विकली आहेत. आता ते शिवोली संपविण्याचा प्रयत्न करत आहेत. या पत्रकार परिषदेला आरजीच्या शिवोली मंडळातील सदस्यांची उपस्थिती होती.

दरम्यान, आपचे राज्य निमंत्रक अॅड. अमित पालेकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, आमदार डिलायला लोबो यांनी स्थानिकांविरुद्ध हणजूण पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारी स्वार्थासाठीच आहेत. पोलिसांनी त्यावर मनमानी केल्यास मी वकील म्हणून लोकांना मोफत सेवा देईन.

मनोज परब यांनी पालेकरांवर प्रत्युत्तर देत सांगितले की, जर पालेकरांना गोमंतकीयांची खरंच काळजी असेल, तर त्यांनी दिल्लीच्या पक्षाचा त्याग करून गोमंतकीयांसोबत यावे.