Connect with us

गोवा खबर

ज्येष्ठ कलाकारांसाठी केंद्र सरकारची आर्थिक सहाय्य योजना

Published

on

Spread the love

           

गोवा खबर:कला आणि संस्कृती संचालनालयाने केंद्र सरकारच्या ज्येष्ठ कलाकारांसाठी आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ कलाकारांकडून अर्ज मागवित आहे.

राज्य सरकारच्या ‘कला सन्मान योजने’ सारखीच ही योजना आहे. या योजनेसाठी पात्र होण्यासाठी, अर्जदाराचे वय साठ वर्षांपेक्षा कमी नसावे. अर्जदाराचे त्याच्या पत्नीच्या उत्पन्नासह वार्षिक उत्पन्न रु. ७२,०००/- (वार्षिक) पेक्षा जास्त नसावे. यामध्ये राज्य सरकारकडून लाभार्थ्याला आधीच मिळत असलेली पेन्शन सहाय्य रक्कमेचा समावेश नाही. पात्र कलाकाराला दरमहा जास्तीत जास्त रु. ६,०००/- पर्यंत आर्थिक मदत दिली जाईल. हा भत्ता राज्य आणि केंद्र सरकारमध्ये वाटून घेतला जाईल.

ज्या कलाकारांना या अगोदर ‘कला सन्मान योजने’चा लाभ मिळत आहे, ते कला आणि संस्कृती संचालनालयाकडून शिफारस पत्र घेऊन वरील केंद्रीय योजनेचा लाभ घेऊ शकतात. जे कलाकार कला सन्मान योजनेचा लाभ घेत नाही ते विभागिय सांस्कृतिक केंद्र, संस्कृती मंत्रालय (पश्चिम क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्र, उदयपूर) येथे थेट अर्ज करून या केंद्रिय योजनेचा लाभ घेऊ शकतात. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी सोमवार ते शुक्रवार या कार्यालयीन वेळेत कला आणि संस्कृती संचालनालय पाटो पणजी येथे संपर्क करावा किंवा संस्कृती मंत्रालयाच्या https://indiaculture.gov.in/scheme-financial-assistance-veteranartists या संकेतस्थळाला भेट द्यावी.