Connect with us

गोवा खबर

वेदांता सेसा गोवा #रनफॉरझिरोहंगर मोहिमेत एकत्र

Published

on

Spread the love

गोवा खबर : वेदांता सेसा गोवाने २०२२ पासून सुरू असलेल्या #रनफॉरझिरोहंगर या मोहिमेअंतर्गत १० लाखांहून अधिक भोजनदानांचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. वेदांता दिल्ली हाल्फ मॅरॅथॉन चा हा एक भाग असून, ‘स्टेप, सेट, गो या अॅपवर नोंदवलेल्या प्रत्येक किलोमीटरसाठी वेदांता कंपनीकडून गरजू व्यक्तींना, विशेषतः मुलांना तसेच प्राण्यांसाठी भोजनदान केले जाते.

२०२५ मधील ४२-दिवसीय आवृत्ती दरम्यान, वेदांता सेसा गोवाने गोवा, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र आणि ओडिशा या ५ राज्यांमध्ये ३० पेक्षा जास्त कार्यक्रम आयोजित केले. या सर्व कार्यक्रमांत कंपनीचे कर्मचारी, कामगार आणि व्यावसायिक भागीदारांनी उत्साहाने सहभाग घेतला. गोव्यात, विशेष कार्यक्रम बिचोली, अमोणा आणि पणजी येथे आयोजित करण्यात आले. यामध्ये २० हून अधिक सहभागींनी एकूण १५०० किलोमीटर अंतर पूर्ण केले, ज्यामुळे त्याच प्रमाणात भोजनदान करण्यात आले.

या मोहिमेचा समारोप दिवार बेटावर ‘फनरायज वॉकथॉन’ या नावाने झाला, ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले. या प्रसंगी सेसा गोवाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन जाजू म्हणाले, “#रनफॉरझिरोहंगर या उपक्रमात जोशपूर्ण सहभाग घेतल्याबद्दल संपूर्ण सेसा गोवा परिवाराचे हार्दिक अभिनंदन! सर्व ठिकाणी आणि सर्व राज्यांमध्ये ‘भुकेमुक्त जग’ निर्माण करण्याची ऊर्जा आणि आवड स्पष्ट दिसत होती. व्हीडीएचएम २०२५ ही फक्त एक मॅरेथॉन न राहता, ‘भुकेविरुद्धची लढाई’ बनली आहे, ज्यामध्ये कुटुंबीय आणि समाज यांनीही मनापासून सहभाग घेतला. प्रत्येकाने दिलेल्या योगदानाबद्दल आणि ‘जगासाठी काहीतरी परत देण्याच्या’ निर्धाराबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.”

ही मोहीम भारतीय खाण ब्युरो आणि महानिदेशालय खाण सुरक्षा यांच्या अंतर्गत आयोजित “स्वच्छोत्सव – स्वच्छता ही सेवा २०२५” या मोहिमेशीही जोडण्यात आली होती. या अंतर्गत स्वच्छता आणि आरोग्याविषयी जनजागृतीसाठी वॉकाथॉन आयोजित करण्यात आले, ज्यामुळे #रानफॉरझिरोहंगर मोहिमेसाठीही अधिक योगदान मिळाले.

या संपूर्ण उपक्रमात मोठ्या प्रमाणावर स्थानिक नागरिक, तसेच शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला, ज्यामुळे “भुकेविना जग” निर्माण करण्याच्या सामूहिक प्रयत्नाला अधिक बळ मिळाले.