Connect with us

गोवा खबर

नामदेव जाधवांना न्याय कधी मिळणार : वर्तक यांचा सवाल

Published

on

Spread the love

गोवा खबर : ‘तारीख पे तारीख’ या दुष्टचक्रात २७ वर्षे अडकल्यानंतर न्यायाच्या प्रतीक्षेत हताश झालेल्या नामदेव जाधव यांनी पुणे न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून आपले आयुष्य संपवले. अखेर ‘तारीख पे तारीख’ कधीपर्यंत चालणार, जाधवांना न्याय कधी मिळणार, असा प्रश्न सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला.

वर्तक म्हणाले, जाधव यांचा मृत्यू हा हिमनगाचे केवळ एक टोक आहेआजमितीला देशभरातील न्यायालयांमध्ये तब्बल ५.३ कोटींहून अधिक खटल्यांचे डोंगर उभे आहेतयातील सर्वाधिक म्हणजे ४.७ कोटी प्रकरणे जिल्हा आणि तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेतजिथे सामान्य माणूस न्यायासाठी पहिला दरवाजा ठोठावतोधक्कादायक म्हणजे यातील १.८ लाखांहून अधिक खटले ३० वर्षांहून अधिक काळ आणि काही खटले तर ५० वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.

नागरीकांचा न्यायावरील विश्वास उडू नये म्हणून सरकारने या समस्येला राष्ट्रीय आपत्ती मानून युद्धपातळीवर काम करण्याची आवश्यकता आहेप्रत्येक खटला एका निश्चित कालमर्यादेत निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय धोरण तयार करून त्याची कठोर अंमलबजावणी करणेन्यायाधीशांचे संख्याबळ आंतरराष्ट्रीय मानकांनुसार वाढवणेन्यायाधीशांची आणि अन्य सर्व रिक्त पदे केवळ भरणेन्यायालयीन पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणेकायदेशीर प्रक्रियेत सुधारणा करणे आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहेया सर्व कृती एकत्रित प्रयत्न केल्यास ‘सर्वांसाठी वेळेवर न्याय’ हे धोरण साध्य होऊ शकतेअसेही वर्तक म्हणाले.