Connect with us

गोवा खबर

प्रत्येक गरीबाच्या घरात चूल पेटायला हवी : मंत्री राणे

Published

on

Spread the love
  • खोतोडे आणि गांजे येथे सभांना मोठा प्रतिसाद

गोवा खबर : सत्तरी तालुक्यातील खोतोडे आणि गांजे परिसरात आरोग्यमंत्री व आमदार विश्वजीत राणे यांच्या सभांना सोमवारी जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. “केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असले की विकासाचा वेग दुप्पट होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास वेगाने सुरू आहे आणि गोव्यात आम्हीही त्याच विचारधारेने काम करतो,” असे मत मंत्री राणे यांनी व्यक्त केले.

राणे म्हणाले की, सत्तरी तालुक्याच्या विकासाचा पाया त्यांच्या वडिलांनी, माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांनी रचला होता आणि भाजप सरकार हीच परंपरा पुढे नेत आहे. प्रत्येक घरात चूल पेटावी, प्रत्येक युवकाला रोजगार मिळावा, सामान्यांच्या जीवनात बदल घडवावा हेच सरकारचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, सत्तरी व उसगाव परिसरातील तरुणांना सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो किंवा इतर अडचण – लोकांच्या समस्यांवर तत्परतेने मदत करणारा मंत्री म्हणून त्यांनी राज्यात आपले वेगळे स्थान निर्माण केल्याचेही राणे म्हणाले.