गोवा खबर: इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे आठवे अधिवेशन २७ ते ३० ऑक्टोबर २०२५ दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे होणार आहे. या अधिवेशनाचा उद्देश आहे, एक सूर्य, एक दृष्टीकोन आणि सौर उर्जेसाठी एकत्रित बांधिलकी या तत्वाखाली जगाला एकत्र आणणे.
भारत आणि फ्रान्स यांनी COP21 (कॉप२१) (पॅरिस) मध्ये सुरू केलेली ही संस्था, ग्लोबल साऊथमधील सर्वात मोठी कराराधारित आंतरसरकारी संघटना आहे, ज्यात १२४ सदस्य आणि स्वाक्षरी केलेले देश आहेत. COP30 (कॉप३०) (ब्राझील) पूर्वी होणारे हे अधिवेशन सौर उर्जा विस्तार, गुंतवणूक, तंत्रज्ञान धोरण आणि कौशल्य विकास या विषयांवर महत्त्वपूर्ण दिशानिर्देश ठरवणार आहे.
या सर्व बैठकींमध्ये १०० हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले. या बैठकींमध्ये सौर ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला, विविध अडचणींवर चर्चा झाली आणि प्रादेशिक उपक्रमांना आयएसएच्या जागतिक प्राधान्यक्रमांशी जोडण्यात आले.