गोवा खबर : दिवाळीच्या उत्सवात गोवा यंदा आणखी तेजाने उजळला आहे! भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि १५५ वर्षांच्या परंपरेचा वारसा असलेल्या सी. कृष्णैया चेट्टी ग्रुप ऑफ ज्वेलर्स यांनी गोव्यात आपले भव्य ज्वेलरी शोकेस प्रदर्शित केले, ज्यामुळे संपूर्ण राज्यात लक्झरी आणि सौंदर्याची नवी झळाळी आली आहे.
या दागिन्यांच्या प्रदर्शनाला प्रचंड उत्साह मिळत असून, ते १० ते १३ ऑक्टोबर २०२५ दरम्यान हॉटेल फिदाल्गो, पणजी, आणि १५ व १६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान हॉटेल नानुटेल, मडगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन व्यवसायिका, व्यावसायिक ऑटोक्रॉस रेसर आणि सेलिब्रिटी इंन्फ्लुएन्सर अशरफी शेटदेसाई गायकवाड, यांच्या हस्ते झाले. त्यांनी सी. कृष्णैया चेट्टी ग्रुपच्या समृद्ध वारशाचे कौतुक करताना सांगितले, इतक्या जुन्या आणि परंपरेने नटलेल्या ब्रँडने गोव्यात एवढे आधुनिक आणि आकर्षक प्रदर्शन आयोजित केले ही खरोखरच आनंददायी गोष्ट आहे. इथले दागिने पारंपरिकतेला आधुनिकतेची सुंदर झळाळी देतात. विशेष म्हणजे, या दागिन्यांमधून विविध संस्कृतींचा संगम दिसतो, म्हणजेच वारसा आणि नव्या पिढीची स्टाइल एकत्र येते.
प्रदर्शनाला भेट देणाऱ्या लोकांना परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळत आहे. चमचमणारे सिट्रिन्स, राजेशाही एमराल्ड्स, तेजस्वी मोती आणि नैतिकतेने तयार केलेले लॅब-ग्रोव्हन डायमंड्स हे विशेष आकर्षण ठरत आहेत.
लोकांना विशेष आवडलेल्या कलेक्शनमध्ये, होयसल कलेक्शन (प्राचीन मंदिरे आणि त्यांच्या वास्तुकलेपासून प्रेरित), फॅरो कलेक्शन (प्राचीन इजिप्तच्या रहस्यमयतेवर आधारित), आणि क्रॅश.क्लब™ लॅब-ग्रोव्हन डायमंड्स, जे आधुनिक काळातील शाश्वत लक्झरीचे नवे परिभाषित उदाहरण आहे.
गोपाल सिंग, स्टोअर मॅनेजर, सी. कृष्णैया चेट्टी ग्रुप यांनी सांगितले, “दिवाळी आमच्यासाठी नेहमीच खास असते आणि गोव्यात पुन्हा एकदा हा उत्सव साजरा करताना आम्ही खूप उत्साहित आहोत. येथील लोकांचा उबदार प्रतिसाद आणि मागील प्रदर्शनांना मिळालेल्या यशामुळे गोवा आमच्यासाठी एक खास ठिकाण आहे. पुढील काही दिवस आम्ही सर्वांना आमच्या नव्या कलेक्शनचा अनुभव घ्यायला आमंत्रित करतो.”
दिवाळीच्या विशेष ऑफर्समुळे या प्रदर्शनाचा आनंद अधिक वाढला आहे. या मधे सिल्व्हर ज्वेलरीवर २% सूट, गोल्ड ज्वेलरीवर ४% सूट, डायमंड ज्वेलरीवर ६% सूट आणि ज्यांची खरेदी ₹१८.६९ लाखांहून अधिक आहे, त्यांना ९% पर्यंत विशेष सूट दिली जात आहे. या ऑफर्स फक्त प्रदर्शनाच्या काळातच लागू राहतील.
याशिवाय, क्रॅश.क्लब™ लॅब-ग्रोव्हन डायमंड्स आणि रेअर सेंट्स™ फ्रेग्रन्सेस वर ९% पर्यंत सूट उपलब्ध आहे.
फक्त ₹५९९ पासून सुरू होणाऱ्या ९२५ सिल्व्हर ज्वेलरीची विक्री ही केली जात असून, त्यातून मिळणारा काही निधी गेंड्यांच्या संवर्धनासाठी वापरला जाणार आहे. अशा प्रकारे, सी. कृष्णैया चेट्टी ग्रुपने त्यांच्या प्रदर्शनात उत्सवाचा आनंद आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर संगम साधला आहे.
तेजस कालरा, पीआर प्रमुख, सी. कृष्णैया चेट्टी ग्रुप यांनी सांगितले, गेल्या १५५ वर्षांपासून आमचा ब्रँड कला, नवोन्मेष आणि नैतिक लक्झरी यांचे प्रतीक राहिला आहे. या दिवाळीतील शोकेसमध्येही त्याच वारशाचा पुढे विस्तार आहे. जिथे परंपरा आणि आधुनिक फॅशन एकत्र येतात, आणि प्रत्येक दागिना एक सुंदर गोष्ट सांगतो.