Connect with us

गोवा खबर

शिवप्रेमी संघटनेतर्फे आयोजित किल्ले बनवा स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा

Published

on

Spread the love
  • शिक्षण खात्याचे राज्यातील सर्व शाळांना परिपत्रकाद्वारे आवाहन

गोवा खबर : अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटनेने युवकांमध्ये शौर्यजागृती करण्यासाठी आगामी दिपावलीच्या निमित्ताने राज्यस्तरीय ‘किल्ले बनवा स्पर्धे’चे आयोजन केले आहे. या स्पर्धेत राज्यातील सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक तसेच विशेष मुलांसाठीच्या शाळा यांच्या प्रमुखांनी त्यांच्या शाळेतील अधिकाधिक मुलांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन शिक्षण खात्याने या परिपत्रकात केले आहे.

अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटनेने आयोजित केलेली ‘किल्ले बनवा स्पर्धा’ ही समुदाय आणि वैयक्तिक घरगुती स्तर, अशा दोन विभागांमध्ये घेतली जाणार आहे. समुदाय स्तरावरील स्पर्धा जिल्हास्तरावर (उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा), तर वैयक्तिक घरगुती स्तरावरील स्पर्धा तालुकास्तरावर घेतली जाणार आहे. या स्पर्धेसाठी बक्षिसे देखील जिल्हा आणि तालुका स्तरांवर देण्यात येणार आहे.

नोंदणीसाठी अंतिम तारीख १५ ऑक्टोबर २०२५ आहे. नोंदणी करण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करणे आवश्यक आहे. किल्ला हा पर्यावरणपुरक वस्तूंचा (इकोफ्रेंडली) उदा. माती आदीचा वापर करून तयार करणे बंधनकारक आहे. किल्ला बनवण्यासाठी थर्माकोल किंवा फायबर आदी पर्यावरणाला घातक अशा वस्तूंचा वापर करू नये. संपर्कासाठी सत्यविजय नाईक (९१५८९ ५४४५५) किंवा सुजय देसाई (९६६५२ १६५५१), असे आवाहन अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटनेने केले आहे.