Connect with us

गोवा खबर

२० सप्टेंबर रोजी पणजीत टेडXपणजी २०२५चे  आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर : शनिवार २० सप्टेंबर रोजी पणजीतील कला अकादमी येथे ‘टेडX पणजी २०२५’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे,  यावर्षीचा विषय ‘इट्स अबाउट टाइम’ (It’s About Time) म्हणजेच, महत्त्वाच्या सामाजिक, वैज्ञानिक आणि मानवी प्रश्नांवर योग्य वेळी कृती करण्याचे आवाहन असा आहे. कार्यक्रम शनिवारी होणार असून आयोजकांनी दहा नामांकित वक्त्यांची घोषणा केली आहे.

यंदाच्या व्यासपीठावर दहा प्रेरणादायी वक्त्यांचा सहभाग आहे. यामध्ये अंटार्क्टिकाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ डॉ. रवीदास कृष्णा नाईक, ‘गुड गर्ल’ या चौकटीला आव्हान देणारी सामाजिक कार्यकर्ती सुमैय्या अफरीन, आंतरराष्ट्रीय कीर्तीची गायिका सोनिया शिरसाट, महिलांच्या आरोग्याविषयी निर्भीडपणे आवाज उठवणाऱ्या तज्ज्ञ डॉ. पारुल आणि अवघ्या १२ वर्षांची डायबेटिस अॅडव्होकेट समायरा पंसारी यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाला गोवा सरकारचा पाठिंबा मिळाला असून विज्ञान, कला, शिक्षण आणि सामाजिक बदल यांचा संगम प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या सोबत कार्यक्रमात ‘इनोव्हेशन हब’ चे देखील आयोजन करण्यात आले आहे, ज्यासाठी २० इनोव्हेटर्स निवडण्यात आले आहे.

“टेडXपणजी चे उद्दिष्ट सदैव नवकल्पना, ज्ञान आणि परिवर्तनाची प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींना एकत्र आणणे आहे. ‘इट्स अबाउट टाइम’ ही थीम समाजात सकारात्मक बदलासाठी तातडीची कृती आणि अर्थपूर्ण संवाद सुरू करण्याचे आवाहन करते,” असे आयोजक व क्युरेटर रवी कामभोज यांनी सांगितले.