Connect with us

गोवा खबर

समाज कार्यकर्ते राम काणकोणकर यांच्यावर हल्ला; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या राजवटीत कायदा-सुव्यवस्थेची दयनीय अवस्था उघड : अमरनाथ पणजीकर 

Published

on

Spread the love
गोवा खबर : गोवा प्रदेश काँग्रेस समिती समाज कार्यकर्ते राम काणकोणकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करते व त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांशी पूर्ण सहानुभूती व्यक्त करते. नऊ तास उलटूनही गोवा पोलिसांना हल्लेखोरांचा मागमूस लागत नाही, ही अत्यंत धक्कादायक व लाजिरवाणी बाब आहे. ही ढिलाई अस्वीकार्य असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या राजवटीत कायदा-सुव्यवस्थेचा पूर्णपणे अंत झाल्याचे हे स्पष्ट दर्शन आहे.
आज गोवा भाजप सरकारच्या राजवटीत असुरक्षित झाला आहे. गोव्याच्या पर्यावरण, संस्कृती व लोकशाही वाचवण्यासाठी लढणाऱ्या निडर आवाजांवर हल्ले होत आहेत, तर पोलिस प्रशासन केवळ पाहत उभे आहे. पोलिसांची ही निष्क्रियता राजकीय हस्तक्षेप व सरकारची नागरिकांचे रक्षण करण्याची इच्छाशक्ती यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते.
हे स्पष्ट आहे की — राम कांकोणकर एकटे नाहीत. काँग्रेस पक्ष व  जनता त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. गोव्याची ओळख, नैसर्गिक वारसा व लोकशाही वाचवण्यासाठीची ही लढाई आणखी ताकदीने सुरू राहील; कुठल्याही धमक्या किंवा दडपशाहीमुळे सत्याचा आवाज बंद होणार नाहीत.
काँग्रेस पक्ष हल्लेखोरांचा तात्काळ शोध घेऊन अटक करण्याची व गोव्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या पूर्ण अपयशाबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जबाबदारी स्वीकारण्याची मागणी करतो.