गोवा खबर : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले की १ व २ नोव्हेंबर रोजी हेडलँड सडा-बोगदा येथे ‘इंडियन रेसिंग फेस्टिव्हल 2025’ची चौथी फेरी आयोजित होणार आहे.
या फेस्टिव्हलसाठी ३.२ किमी लांबीचा समुद्रकिनाऱ्यावरील सर्किट निवडण्यात आला आहे, ज्याला “गोवा स्ट्रीट रेस 2025” असे नाव देण्यात आले आहे. हे दक्षिण आशियातील पहिले सी-साइड ट्रॅक ठरणार आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, या उपक्रमामुळे गोव्याची आंतरराष्ट्रीय ओळख, पर्यटन वाढ, रोजगारनिर्मिती आणि तरुणांसाठी अभियांत्रिकी-तंत्रज्ञान क्षेत्रातील संधी वाढतील. त्यामुळे गोवा जागतिक क्रीडा नकाशावर वेगळ्या पातळीवर झळकणार आहे.