गोवा खबर : शुक्रवार, 12 सप्टेंबर रोजी म्युझियम ऑफ गोवा (मोग), पिळर्ण, येथे ‘ह्यूमन्स इन द लूप’ या पुरस्कारप्राप्त चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे. हा चित्रपट अरन्या सहाय यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे.
ही कथा आहे नेहमा या झारखंडमधील आदिवासी महिलेची, जी एका दुर्गम AI केंद्रात डेटा लेबलर म्हणून काम सुरू करते. ती संयम आणि काळजीने अल्गोरिदम प्रशिक्षित करत असताना, तिला तंत्रज्ञानात अंतर्भूत असलेले मानवी पूर्वाग्रह दिसू लागतात आणि AI कधी स्वदेशी जागतिक दृष्टिकोन प्रतिबिंबित करू शकते का असे प्रश्न पडतात.
अरन्या सहाय या मुंबईत कार्यरत असलेल्या भारतीय दिग्दर्शिका आहेत. त्यांच्या चित्रपटांमधून त्या तंत्रज्ञान, समाज आणि ओळख यांमधला संबंधांचा शोध घेतात. त्यांचा पहिला फीचर फिल्म ‘ह्यूमन्स इन द लूप’ ला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. या चित्रपटाने NYIFF 2025 मधील सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट पुरस्कार, IFFLA 2025 मधील ग्रँड ज्युरी अवॉर्ड फॉर बेस्ट फीचर फिल्म आणि FIPRESCI अवॉर्ड फॉर बेस्ट फीचर फिल्म 2025 जिंकला आहे.
दिनांक व वेळ: शुक्रवार, 12 सप्टेंबर 2025, सायं. 7:00
स्थळ: म्युझियम ऑफ गोवा, पिळर्ण इंडस्ट्रियल इस्टेट, बार्देश
भाषा: हिंदी आणि इंग्रजी (इंग्रजी उपशीर्षकांसह)
कालावधी: 74 मिनिटे
प्रवेश: मोफत
नोंदणीसाठी संपर्क: कॉल/व्हॉट्सअॅप 7722089666