Connect with us

गोवा खबर

गालजीबागमध्ये सागरी उद्यान उभारण्याचा निर्णय : विश्वजीत राणे

Published

on

Spread the love

गोवा खबर : गालजीबाग, काणकोण येथे प्रस्तावित मरिन कंझर्वेशन पार्क उभारण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

या बैठकीत बोंडला अभयारण्यासंबंधी आणि इतर संबंधित गोष्टींवरही चर्चा झाली. वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी प्रस्तावना सादर केली आणि मंत्री यांनी काही मार्गदर्शक सूचना दिल्या.

प्रस्तावित प्रकल्पामध्ये सागरी वन्यजीव व समुद्री परिसंरक्षणाच्या दृष्टीने विविध उपक्रम आखण्याचा विचार आहे. तसेच सत्तरीतील चरावणे येथील प्रस्तावित जलाशयामुळे आसपासच्या शेतकऱ्यांना २४ तास पाणीपुरवठा करण्याची क्षमता मिळेल — यासाठी पुढील आठवड्यात संबंधित मंत्र्यांसह बैठक घेण्याचे मंत्री राणे यांनी सांगितले. या जलाशयासाठी पूर्वी मंजूर निधी व योजनांचा आढावा घेऊन पुढील पावले उचलण्यात येतील, असेही त्यांचे म्हणणे होते.