Connect with us

गोवा खबर

राज्यपालांकडून ओणम सणाच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

राज्यपाल पी अशोक गजपती राजू यांनी गोव्यातील लोकांना आणि विशेषत: जगातील केरळीयन समाजातील बांधवाना ओणम सणाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, ओणम हा सण समृद्ध, सौहार्द आणि सांस्कृतिक वारशाचा एक मोठा आणि महत्वपूर्ण सण आहे. हा सण मावेली (राजा महाबली) यांच्या राजवटीच्या स्मरणार्थ साजरा  करतात, ज्यांची राजवट समता, न्याय आणि भरभराटीची मानतात. हा सणामध्ये एकता, करुणा आणि समावेशकता दिसून येते जो कालातीत आणि सार्वत्रिक आहे. पूक्कलमपासून ते ओणसाद्यापर्यंत ओणमची परंपरा आनंद, एकता आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे. हा सण खरा आनंद आणि सामायिक समृद्धीची देवाण घेवाण करण्याच्या भावनेत आहे, या चिरस्थायी संदेशाची आठवण करून देतो. हा ओणम आपल्याला या मूल्यांचे पालन करण्यास आणि आपल्या समाजात बंधुत्वाचे बंधन मजबूत करण्यास प्रेरित करो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात .