Connect with us

गोवा खबर

ग्रामीण मुलांना गणेशोत्सवातून व्यासपीठ

Published

on

Spread the love

गोवा खबर : केरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाही सामाजिक उपक्रमांना विशेष महत्त्व दिले असून, यामुळे ग्रामीण भागातील मुलांना आपली कला व प्रतिभा सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. त्यामुळे मुलांच्या नावलौकिकाला महत्त्वाची चालना मिळेल, असे मत गोवा वनविकास महामंडळाच्या अध्यक्षा व आमदार डॉ. दिव्या राणे यांनी व्यक्त केले.

साखळी येथील त्यांच्या निवासस्थानी ‘गणेशोत्सव 2025’ च्या कार्यक्रमपत्रिकेचे अनावरण करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पिसुर्लेकर, सचिव दीपक नार्वेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी आमदार प्रविण झांट्ये यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

कळंगुट आमदार मायकल लोबो आणि शिवोली आमदार दिलायला लोबो यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

मगो पक्षाकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

आप गोवा समन्व्यक अमित पालेकर यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

माजी खासदार नरेंद्र सावईकर यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

गोवा प्रदेश भाजप कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

गोवा सरकारकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

गोवा पर्यटन खात्याकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

या वर्षी मंडळाचा 20 वा वर्धापन दिन असून धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल होणार आहे.

1 सप्टेंबर रोजी रणमाले पथकाचे सादरीकरण

2 सप्टेंबर रोजी अखिल गोवा महिला भजनी स्पर्धा

3 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील बादल चौधरी यांचा ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम व दशावतारी नाट्यप्रयोग

4 सप्टेंबर रोजी कोंकणी विनोदी नाटक ‘मावशी आमका खावशी’

5 सप्टेंबर रोजी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा व जादू प्रयोग

6 सप्टेंबर रोजी सत्यनारायण महापूजा, आरती, महाप्रसाद व विसर्जन मिरवणूक

सर्व भाविकांनी कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.