Connect with us

गोवा खबर

कोचीतील वॉटर टॅक्सी प्रकल्पाचा मंत्री सुभाष फळदेसाई यांनी घेतला आढावा

Published

on

Spread the love

गोवा खबर : नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी कोची रेल मेट्रो मुख्यालयाला भेट देऊन तेथील वॉटर टॅक्सी प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी व्यवस्थापकीय संचालक लोकनाथ बेहरा यांनी गोव्यातही अशा प्रकारचा प्रकल्प कसा राबविता येईल, याची माहिती दिली.

फळदेसाई यांनी कोची येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये केंद्रीय नौवहन व बंदरे मंत्री सरबानंदा सोनोवाल यांचीही भेट घेतली. त्यांनी गोव्यात वॉटर टॅक्सी प्रकल्पाची व्यवहार्यता स्पष्ट केली असून, केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले.

कोची मेट्रोच्या टीमसोबत मंत्री फळदेसाई यांनी वॉटर टॅक्सीची सफर करून त्यामागील तंत्रज्ञान व अंमलबजावणीची माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, कोचीमध्ये प्रभावीपणे राबविण्यात आलेले अनेक उपाय गोव्यासाठीही उपयुक्त ठरू शकतात. केंद्र सरकारने आम्हाला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.