Connect with us

गोवा खबर

शिंदे गटाची गोव्यात एंट्री

Published

on

Spread the love

पणजी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा गोव्यात प्रवेश झाला आहे. उपेंद्र गावकर यांची गोवा राज्यप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

काशिनाथ मयेकर (राज्य सचिव), सुनील सांतिनेझकर (उत्तर गोवा अध्यक्ष) आणि गणबा नाईक देसाई (दक्षिण गोवा अध्यक्ष) अशी नवीन संघटना जाहीर झाली.

2027 च्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू असून लवकरच पणजीत मोठा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला जाणार आहे. या मेळाव्यास एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत.