गोवा खबर : राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत आज दोना पावला येथील राजभवनातील दरबार सभागृहामध्ये झालेल्या समारंभात मडगाव आणि काणकोणचे आमदार अनुक्रमे दिगंबर कामत आणि रमेश तवडकर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

कार्यक्रमाला पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, आरोग्य मंत्री विश्वजित राणे, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, वीज मंत्री रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर, आमदार नीलेश काब्राल, डॉ देविया राणे, जीत आरोलकर, प्रविण आर्लेकर, रूडोल्फ फर्नांडिस, प्रेमेंद्र शेट, संकल्प आमोणकर, दाजी साळकर, सरकारचे सचिव, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.