Connect with us

गोवा खबर

छायापत्रकार संघटनेला सरकारचा पूर्ण पाठिंबा : मुख्यमंत्री 

Published

on

Spread the love

गोवा खबर : फोटोग्राफी हा एक उत्तम करिअरचा पर्याय असून, छायापत्रकारांचे काम म्हणजे समाजाच्या जीवनाचा खरा आरसा आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

‘जागतिक फोटोग्राफी दिन’ तसेच गोवा छायापत्रकार संघटनेच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त पणजीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव, प्रियोळचे आमदार गोविंद गावडे, संघटनेचे अध्यक्ष संदीप देसाई आणि सरचिटणीस नारायण पिसुर्लेकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, छायाचित्रकारांनी अनेकदा जीव धोक्यात घालून फोटो मिळवले आहेत. हे फक्त त्यांच्यातील छायाचित्रणावरील निस्सीम प्रेमामुळे शक्य झाले आहे. सरकारने आजवरही छायापत्रकारांना आवश्यक मदत केली आहे आणि पुढेही सर्वतोपरी पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांनी पुढे सांगितले, छायाचित्र प्रदर्शन म्हणजे राज्याच्या संस्कृतीचा आरसा आहे. हे पाहिल्यास गोव्याच्या विविध भागात फिरल्याचा अनुभव मिळतो. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी छायाचित्र स्पर्धा घेऊन पुढील पिढी घडविण्याचे काम संघटना करत आहे, हे कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमात छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. ‘लोकमत’चे छायाचित्रकार गणेश शेटकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.