गोवा खबर : सभापती रमेश तवडकर यांनी फाळणीच्या भयावह स्मृतिदिनानिमित्त काणकोण येथील कदंब बस स्थानकावर आयोजित केलेल्या भारताच्या फाळणीच्या घटनांचे वर्णन करणाऱ्या एका विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन केले. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीच्या घटनावरील प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन त्यांनी युवकाना केले.
फाळणीच्या भयावहतेचा स्मरण दिन १४ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो यादिनी भारताच्या फाळणीदरम्यान बळी पडलेल्यांचे आणि त्यांच्या दुःखाचे स्मरण केले जाते.
सभापती तवडकर यांनी फाळणीच्या भयावहतेवर आधारित हे प्रदर्शन फाळणीत जीव गमावलेल्या आणि विस्थापित झालेल्या लाखो लोकांना आदरांजली अर्पण करते. फाळणीबद्दलचा इतिहास जाणून घेण्यासाठी तरुण आणि विद्यार्थी समुदायांना प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले. माहिती आणि प्रसिद्धी खात्याने आयोजित केलेले हे प्रदर्शन १६ ऑगस्ट २०२५ पर्यंत काणकोण येथील कदंब बस स्थानकावर सर्वसामान्यांसाठी खुले राहील.