गोवा खबर : १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.१५ वाजता पणजीतील जुन्या सचिवालयासमोर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तिरंगा ध्वज फडकावतील आणि जनतेला संबोधित करतील.
स्वातंत्र्यदिनी तालुका पातळीवर विविध ठिकाणी ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आले आहेत. म्हापसा येथे पर्यटन मंत्री रोहन खवंटे ध्वजारोहण करतील, डिचोली येथे आमदार चंद्रकांत शेट्ये, फोंडा येथे कृषी मंत्री रवी नाईक, काणकोण येथे ऊर्जा मंत्री रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर, चिखली येथे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, मडगाव येथे आमदार दिगंबर कामत, पेडणे येथे मत्स्योध्योग मंत्री निळकंठ हळर्णकर, वाळपई येथे आमदार देविया राणे, केपे येथे समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, धारबांदोडा येथे आमदार डॉ. गणेश गावकर आणि सांगे येथे जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर ध्वजारोहण करतील.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत स्वातंत्र्यसैनिक आणि इतर मान्यवरांसह नंतर पेडणे येथील पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करतील.
देश ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम साजरा करीत आहे ही मोहीम आझादी का अमृत महोत्सवाच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. लोकांना भारताच्या स्वातंत्र्याचे औचित्य साधून तिरंगा घरी आणण्यास आणि तो फडकविण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. मोहिमेचा तिसरा टप्पा १३ ते १५ ऑगस्ट २०२२ पासून सुरू झाली होती ज्यामध्ये लोकांना त्यांच्या घरांवर, संस्था, व्यवसायिक उपक्रमांवर ध्वज फडकविण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक शहरात, गावात विविध ठिकाणी ध्वज उपलब्ध करून दिले जात आहेत.
” हर घर तिरंगा ” मोहिमेत सहभागी होण्यासाठी जनतेने त्यांच्या घरी तिरंगा फडकवावा आणि आपल्याला एकत्र बांधणाऱ्या एकता, अभिमान आणि राष्ट्रीयत्वाचे रंग साजरे करूया. लोकांनी https://harghartiranga.com/selfie वर भेट देऊन तिरंगासोबतचा त्यांचा सेल्फी अपलोड करू शकतात.