Published
8 months agoon
गोवा खबर : गोवा राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग आणि राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय यांच्याद्वारे, भारत सरकारच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग, केंद्रीय सामादिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग आणि युनायटेड नेशन्स इंडिया यांच्या सहकार्याने, ९ ते १२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान होणाऱ्या आगामी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट- गोवा २०२५ (आयपीएफजी) साठी पर्पल अॅम्बेसेडरची घोषणा अभिमानाने करण्यात आली.
दिव्यांगजन सक्षमीकरण मंत्री सुभाष फळदेसाई; केंद्रीय दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल (आयएएस), भारतातील संयुक्त राष्ट्रसंघाचे निवासी समन्वयक शोम्बी शार्प; राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर; गोवा राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे सचिव प्रसन्ना आचार्य (आयएएस), राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या संचालिका वर्षा नाईक, राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाचे सचिव ताहा हाझिक, दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे उपसंचालक डॉ. मृसेल्डा मोंतेरो, आयपीएफजी २०२५ साठी राजदूतांच्या निवडीसाठी नामांकन समितीचे सदस्य प्रकाश कामत आणि एनसीईपीईडीपीचे कार्यकारी संचालक तसेच आयपीएफजी २०२५ राजदूतांच्या नामांकन समितीचे सदस्य अरमान अली आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या राजदूतांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना गोवा राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले की, “या महोत्सवासाठी २१ पर्पल अॅम्बेसेडरची केलेली नियुक्ती ही सर्वसमावेशक विकास आणि समान संधी उपलब्ध करण्यासाठी आमची वचनबद्धता दर्शवते. हे व्यक्ती केवळ प्रतिनिधी नाहीत, तर बदल घडवणारे नेतृत्व आहेत, जे दिव्यांग व्यक्तींसाठी प्रवेशसुलभता, जागरूकता आणि सन्मान वाढविण्यासाठी नेतृत्व करत आहेत. क्षमतांचा सोहळा साजरा करणारे तसेच व्यापक प्रभाव निर्माण करणाऱ्या या जागतिक व्यासपीठाचे यजमानपद गोवा राज्य पुन्हा एकदा भूषविणार असल्याबाबत आम्हाला अभिमान आहे.”
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल (आयएएस) यांनी सांगितले की, “पर्पल फेस्ट हा महोत्सव समावेशकता आणि सक्षमीकरणाची चळवळ म्हणून उदयास आला आहे. पर्पल अॅम्बॅसेडर्सची निवड ही समुदाय-नेतृत्वाखालील सहभाग आणि पुरस्कार सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक दमदार पाऊल आहे. यंदाच्या महोत्सवासाठी निवडलेले अम्बेसिडर हे विविध क्षेत्रांतील असून याद्वारेही विविधतेतून सर्वसमावेशकता साजरी होत असल्याची बाब प्रशंसनीय आहे. यामुळे सर्वसमावेशकता, प्रवेशसुलभता आणि सुसंवादातून धोरणनिर्मितीबाबत या महोत्सवातून नवे मापदंड स्थापित होतील असा विश्वास आम्हाला आहे.”
भारतातील संयुक्त राष्ट्रसंघाचे निवासी समन्वयक शोम्बी शार्प यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, “पर्पल फेस्ट सर्वांसाठी समानता, समावेशकता आणि प्रतिष्ठा वाढवण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक ध्येयाशी सुसंगत आहे. संपूर्ण भारत देशभरातूंन करण्यात आलेल्या या राजदूतांची नियुक्ती ही सर्वांच्या साथीने शाश्वत विकास उद्दिष्टांच्या भावनेला मूर्त रूप देते. महिला आणि ग्रामीण समाजाचे प्रतिनिधित्व असलेल्या या असाधारण उपक्रमास संयुक्त राष्ट्रसंघ अभिमानपूरक पाठिंबा देत आहे.”
या प्रसंगी बोलताना, राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर म्हणाले की, “पर्पल अॅम्बेसेडर हे या महोत्सवाचे केंद्रबिंदू आहेत. त्यांच्या माध्यमातून विविध अनुभव, सहानुभूती आणि नेतृत्वक्षमता जगासमोर आणली जात आहे. त्यांचा विचार, त्यांचे मत हे केवळ या उपक्रमाचेच नाही तर एकूणच भारतातीलव्यापक समावेशकतेच्या चळवळीला आकार देणारे ठरेल. प्रवेशसुलभता, समावेशकता आणि अधिकाराधारित सक्षमीकरणाबाबत देशाचे नेतृत्व करण्याबाबत गोवा राज्याची भूमिका प्रदर्शित करणाऱ्या गोव्यातील स्थानिक प्रतिनिधित्वाचा आम्हाला विशेष अभिमान आहे.”
गोवा राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या संचालिका वर्षा नाईक म्हणाल्या, “प्रत्येक पर्पल अॅम्बेसेडरची निवड केवळ प्रतिनिधित्वापुरती मर्यादित नाही, तर त्यांच्यात असलेली प्रेरणादायी, सहभाग आणि बदल घडवून आणण्याच्या क्षमता यानुसार काळजीपूर्वक करण्यात आली आहे. पर्पल फेस्ट २०२५मधील त्यांचा सहभाग हा समुदायाच्या आवाजाला बळकटी देईल, तळागाळात जागरूकता वाढवेल आणि सर्व क्षमतांचा उत्सव साजरा करणारा हा उपक्रम आणि असा समाज घडविण्यासाठी पाठबळ देईल.”
या वर्षी, वेगवेगळ्या दिव्यंगत्वाचे प्रतिनिधित्व करणारे २१ प्रतिनिधी पर्पल अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. या महोत्सवाच्या कार्यकारी आणि नामांकन समित्यांनी कडक नामांकन प्रक्रियेच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशातून निवडलेले हे अॅम्बेसेडर या महोत्सवाचा प्रभाव अधिक व्यापक करण्यात आणि या चळवळीला बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहेत. उल्लेखनीय म्हणजे, अम्बेसिडर निवडीमध्ये या वर्षी एक महत्त्वपूर्ण बदल घडला आहे, तो म्हणजे यामध्य बहुतांश महिला राजदूतांचा समावेश आहे. यामुळे लैंगिक समावेशकतेच्या चळवळीलाही प्रोत्साहन मिळणार आहे. २०२५च्या महोत्सवामध्ये ग्रामीण समावेशनावरही भर दिला गेला असून, यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील विचारांना प्रतिनिधित्व, स्थान मिळणार आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वपूर्ण असलेल्या या महोत्सवामध्ये अम्बेसिडर म्हणून गोवा राज्यातून झालेली तीन प्रतिनिधींची निवड ही बाब स्थानिक सहभागाचे महत्व अधोरेखित करते. या महोत्सवातून वैयक्तिक स्तरावरील निर्धाराच्या यशोगाथांवर प्रकाश टाकला जाणार आहेच, त्याचबरोबर अडथळेमुक्त, समावेशक भारत निर्मितीबाबत पर्पल फेस्टचे आखलेल्या व्यापक धोरणालाही बळकटी मिळणार आहे.
पर्पल अॅम्बेसेडर म्हणून या प्रेरणादायी व्यक्ती खालील जबादाऱ्या पेलणार आहेत:
• प्रामाणिकपणा आणि नेतृत्वगुणांच्या जोरावर दिव्यांग समाजाचे प्रतिनिधित्व करणे
• महोत्सवाच्या प्रचार आणि प्रसारासाठी प्रत्यक्ष उपक्रम आणि ऑनलाइन उपक्रमांमध्ये सहभागी होणे
• महोत्सवातील प्रमुख कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग दर्शवित समावेशक संवादांमध्ये योगदान देणे
• महोत्सवाची प्रवेशसुलभता आणि समावेशकता वाढविण्यासाठी सूचना-शिफारशी करणे
• महोत्सवाच्या आयोजनानंतरी आपापल्या प्रदेशांमध्ये दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांसाठी वकालत, पुरस्कार करणे.
भारतातील सर्वात समावेशक आणि परिवर्तनकारी उपक्रमांपैकी एक म्हणून साजरा केला जाणारा पर्पल फेस्ट हा महोत्सव क्षमतांचा सन्मान करण्यासाठी, जागरूकता वाढवण्यासाठी आणि दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे समर्थन करण्यासाठी सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणतो. दिव्यांग व्यक्तींचे हक्क कायदा, २०१६ अन्वये मान्यताप्राप्त सर्व २१ प्रकारच्या दिव्यंगत्वांच्या प्रतिनिधित्वासह, पर्पल अॅम्बेसेडर उपक्रम हा समावेशकतेची चळवळ तळागाळापर्यंत पोचवणे आणि सक्षमीकरणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
या चळवळीला सर्व नागरिकांनी, संस्था, व्यावसायिक संस्था आणि सामाजिक संस्थांनी पाठिंबा देऊन प्रत्येक विचाराला स्थान देणारा आणि सर्व क्षमतांचा सोहळा साजरा करणाऱ्या पर्पल फेस्ट गोवा-२०२५मध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजन समितीद्वारे करण्यात येत आहे.
Guardian Angel SC Stun Goa Police with Hard-Fought Victory
कोकणातील गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी जलाशय आणि अमृत सरोवरांचा वापर
राष्ट्रपतींची अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी मंदिराला भेट; रामलल्लाचे दर्शन
मुंबई सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंमली पदार्थांच्या तस्करीचे प्रयत्न हाणून पाडले
गोव्यासाठी हवामान इशारा : आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
AAP’s Geetesh Naik Appeals Bhandari Samaj To Vote For Someone Who Understands Struggles of a Common Man, and Reject Familyraj