Connect with us

गोवा खबर

हॉस्पिटालीटी प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी व्यावसायिकांना अर्ज करण्याचे आवाहन

Published

on

Spread the love

गोवा खबर : सुक्ष्म, लहान आणि मध्यम उध्योग विकास आणि सुविधा कार्यालयाने भारत सरकार यांच्या वतीने गोवा राज्यात पीएम योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. या योजनेप्रमाणे २० ते २२ ऑगस्ट २०२५ पर्यंत डॉ शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम, बांबोळी येथे आयोजित गोवा हॉस्पीटालिटी प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी सहकार्य देणार आहे.

या प्रदर्शन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गोवा राज्यातील सुक्ष्म, लहान आणि मध्यम उध्योगास प्रोत्साहन देण्यात येईल.

या प्रदर्शन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एमएसएमईकडून १० ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. कमर्शिएल किचन इक्वीपमेंट, हॉटेल फर्निशिंग, रेस्टॉरंट, बेकरी, फुड आणि ब्रिव्हरेजीस उत्पादक आणि सेवा देणाऱ्या व्यावसायिकांनी या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी आपल्या उध्यम नोंदणी कार्यक्रमाव्दारे ऑनलाईन अर्ज करावे.