Connect with us

गोवा खबर

डोक्याला दुखापत होण्यापासून रोखण्यासाठी जागरूकता कार्यक्रम, सायकल रॅलीचे आयोजन

Published

on

Spread the love

६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत गोवा विद्यापीठ सभागृह, ब्लॉक ई, स्कूल ऑफ केमिकल सायन्स येथे आरोग्य मंत्री श्री. विश्वजित राणे यांच्या उपस्थितीत “डोक्याच्या दुखापतीला प्रतिबंधक” या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या न्यूरोसर्जरी विभागाने आणि नॉन-कम्युनिकेबल डिसीज सेल, आरोग्य सेवा संचालनालय, गोवा वाहतूक पोलिस, वाहतूक संचालनालय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या सहकार्याने आयोजित केला आहे.

या जागरूकता कार्यक्रमानंतर गोवा विद्यापीठाच्या केमिस्ट्री ब्लॉकपासून बाईक रॅलीचे आयोजन केले असून क्लॉक टॉवरवर वळसा घालून गोवा विद्यापीठाच्या केमिस्ट्री ब्लॉकपर्यंत परत ही रॅली येईल.