Connect with us

गोवा खबर

केंब्रिज दक्षिण आशियातील 1,000 शाळांपर्यंत पोहचले, शिक्षणात नवकल्पना आणि उत्कृष्टता विशेष

Published

on

Spread the love
  • भारतातील 800 हून अधिक केंब्रिज इंटरनॅशनल शाळा भविष्यासाठी तयार शिक्षणाकडे उपयुक्त शिक्षणाकडे कल

गोवा खबर : केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अ‍ॅण्ड असेसमेंट (केंब्रिज) च्या आंतरराष्ट्रीय शिक्षण विभागाने आज दक्षिण आशियामध्ये 1,000 हून अधिक केंब्रिज आंतरराष्ट्रीय शाळांचा टप्पा गाठल्याची घोषणा केली. यामध्ये भारतातील 800 हून अधिक शाळा केंब्रिजच्या शैक्षणिक कार्यक्रमांची अंमलबजावणी करत आहेत. या प्रदेशातील केंब्रिज शाळांची एकूण संख्या गेल्या वर्षभरात 16% ने वाढली असून, 2023-24 मध्ये 894 वरून 2024-25 मध्ये ती 1,034 वर पोहोचली आहे. यामधील 81% नवीन शाळा भारतात उघडल्या गेल्या आहेत. दक्षिण आशियामधील सर्व केंब्रिज आंतरराष्ट्रीय शाळांपैकी 75% पेक्षा अधिक शाळा भारतात आहेत, त्यानंतर 12% शाळा बांगलादेशमध्ये आहेत.

पुण्यातील ब्रह्मप्रिया वर्ल्ड स्कूल ही केंब्रिजची 1000 वी शाळा ठरली आहे. केंब्रिज आंतरराष्ट्रीय शाळांपैकी 53% शाळा टियर १ शहरांमध्ये आहेत, ज्यातून आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे शहरी भागांमध्ये केंद्रित होणे स्पष्ट होते. भारताच्या दक्षिणेकडील भागात लहान शहरांमध्ये केंब्रिज शाळांची सर्वाधिक वाढ झाली आहे. टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये एकत्रितपणे 47% शाळा आहेत, जे आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा विस्तार महानगरे वगळता इतर शहरांमध्ये व गावांमध्येही होत असल्याचे दर्शवते.

दक्षिण आशियामध्ये केंब्रिजचा झालेला विस्तार हा आंतरराष्ट्रीय शिक्षणाकडे झुकणाऱ्या जागतिक प्रवाहाचे प्रतिबिंब आहे. 2024 मध्ये केंब्रिज परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही आजवरच्या कोणत्याही वर्षापेक्षा जास्त होती. या भागातील शाळांच्या समुदायाकडून आलेल्या मागण्यांना प्रतिसाद देत, केंब्रिज मार्च 2026 पासून तिसरी केंब्रिज चेकपॉईंट चाचणी मालिका सुरू करणार आहे. यामुळे शाळांना त्यांच्या शैक्षणिक दिनदर्शिकेनुसार परीक्षा नियोजनात अधिक लवचिकता मिळणार आहे.

केंब्रिजसोबत विद्यार्थ्यांना AS & A लेव्हलसाठी 50 पेक्षा अधिक आणि केम्ब्रिज आयजीसीएसइ (Cambridge IGCSE) साठी 70 पेक्षा अधिक विषयांची निवड करता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे व गरजेनुसार विषय निवडण्याचे व्यापक स्वातंत्र्य मिळते. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून एकोणीस वर्षांपर्यंतचा केंब्रिज पाथवे विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषणात्मक विचारशक्ती आणि स्वतंत्र संशोधन कौशल्ये विकसित करण्यासाठी डिझाइन केला आहे, तसेच संवादकौशल्य आणि नेतृत्वगुणही घडवतो.

गेल्या वर्षी केंब्रिजने भारतात केम्ब्रिज क्लायमेट क्वेस्ट (Cambridge Climate Quest) हा एकमेव अशा प्रकारचा हवामान साक्षरता कार्यक्रम सुरू केला, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना हवामान व शाश्वततेसंबंधी प्रश्नांमध्ये सहभागी होण्यास प्रेरित केले जाते. सखोल विषयज्ञानासोबतच, ही कौशल्ये विद्यार्थ्यांना वास्तव आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मदत करतात.

दक्षिण आशियामधील आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विनय शर्मा म्हणाले, “दक्षिण आशियामध्ये 1,000 शाळांचा टप्पा पार करणे हे जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याच्या आमच्या दृढ निष्ठेचे प्रतीक आहे, जे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही सक्षम बनवते. भारतात 800 हून अधिक केंब्रिज आंतरराष्ट्रीय शाळा असणे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, आणि या संपूर्ण भागात नवोपक्रम, समावेश आणि गुणवत्ता यांचे नेतृत्व करत असल्याचा आम्हाला आनंद आहे. आमचे शैक्षणिक कार्यक्रम केवळ शैक्षणिक यशापुरते मर्यादित नाहीत — ते विद्यार्थ्यांना कौशल्ये, विचारसरणी आणि आत्मविश्वास देतात, ज्यामुळे ते हवामान बदलापासून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उदयापर्यंतच्या जागतिक आव्हानांना सामोरे जाऊ शकतात. आमच्या शाळांसोबत मिळून, आपण शिक्षणाचे भविष्य घडवत आहोत.”

दक्षिण आशियामध्ये केंब्रिज आपले कार्यक्षेत्र विस्तारत असताना, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला, आयुष्यभराच्या शिक्षणाला आणि जागतिक स्तरावर तयार राहण्याच्या क्षमतेला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर कायम आहे. नवोन्मेषी कार्यक्रम, काटेकोर मूल्यमापन आणि उपयुक्त शैक्षणिक साधनांच्या माध्यमातून केंब्रिज शिक्षण क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करत आहे आणि संपूर्ण प्रदेशात शाळांसोबत मिळून विद्यार्थ्यांचे जीवन परिवर्तन करण्याचे कार्य करत आहे.